बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे तरुण ठार

जुलै 29, 2025 10:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२५ । चोपडा तालुक्यातील अडावद येथे भीषण अपघात झाला. ज्यात दुचाकीला भरधाव बोलेरोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. महेंद्र शांताराम दोडे (क्य ३७) आणि युवराज तुकाराम तायडे (वय ३३) असं अपघातात ठार झालेलं ठार झालेल्या दोघांची नावे असून याबाबत अडावद पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

adavad acc

भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील महेंद्र दोडे व युवराज तायडे हे दोघे भिलटदेव बाबाच्या दर्शनासाठी मोटारसायकलने (एमएच १९ बी.जे. ८६०२) ने जात असताना समोरुन येणाऱ्या बोलेरो (एम.एच. १९ सि.एक्स १४९०) गाडीने धडक दिली.

बोलेरोचा चालक मनोज संजय पाटील रा. वेले ता. चोपडा याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकीस जोरदार धडक दिली. यात दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच अडावद पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह चोपडा येथील उपजिल्हा पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी अडावद पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now