जळगाव लाईव्ह न्यूज । विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव येथे सीबीएसई क्लस्टर नाइंथ कबड्डी स्पर्धा (२०२५-२६) चा उद्घाटन सोहळा उत्साहात व दिमाखात पार पडला.या स्पर्धेसाठी महाराष्ट्र,गोवा दीव- दमण या राज्यातून एकूण ३६ सी.बी.एस. ई शाळा व त्यांचे ६३ संघ सहभागी झाले आहे. यामधील एकूण खेळाडूंची संख्या ८०० इतकी आहे.

जिल्हाधिकारीआयुष प्रसाद, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, राज्यस्तरीय क्रिकेटपटू व माजी विद्यार्थी श्री शिवप्रसाद पुरोहित, सी.बी.एस.ई परीक्षक फैजल शेख, शहर समन्वयिका व सहोदया ग्रुप अध्यक्षा सौ. सुषमा कंंची, माजी नगरसेवक श्री नितीन बरडे, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, प्रतिष्ठानचे सचिव श्री विनोद पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर डॉ. अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योगा डान्स सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सीबीएसईचा ध्वज फडकवला गेला. आयुष प्रसाद व शिवप्रसाद पुरोहित यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली, तर शपथविधी माजी विद्यार्थी श्री शिवप्रसाद पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे यांनी केले. केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री भरतदादा अमळकर यांनीआपल्या अध्यक्षीय भाषणात संघभावना ,खेळाडूवृत्ती जोपासावी व मोबाईलचा वापर मर्यादित स्वरूपात करावा यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले; तर आयुष्य प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ. चित्रा पाटील यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सौ अश्विनी बाविस्कर यांनी करून दिला. या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा व काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या शालेय समितीच्या अध्यक्षा सौ हेमाताई अमळकर यांचे मार्गदर्शन व प्रशासकीय अधिकारी श्री. दिनेश ठाकरे व वाहन विभाग प्रमुख श्री मिलिंद पुराणिक यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी विविध सी.बी.एस.ई शाळांचे मुख्याध्यापक विवेकानंद प्रतिष्ठानच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .अशा या थरार वाढवणाऱ्या कबड्डी स्पर्धेचा अनुभव पुढील दोन दिवस घेता येणार आहे.












