लोणावळा, खंडाळा विसराल..! जळगाव जवळच्या ‘या’ सुदंर हिल स्टेशनला नक्की भेट द्या..

जुलै 23, 2025 5:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । पावसाळ्यात फिरण्यासाठी देशासह महाराष्ट्रात अनेक सुंदर हिल स्टेशन्स आहेत. जर तुम्हीही हिल स्टेशनला भेट देण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला जळगाव जवळच्या काही चांगल्या हिल स्टेशन्सबद्दल सांगणार आहोत.

jalgaon hill station

त्यात पाल, तोरणमाळ आणि चिखलदरा यांचा समावेश आहे. तर पाल हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात आहे आणि यावल वन्यजीव अभयारण्याजवळ आहे. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यात आहे. तसेच चिखलदरा अमरावती जिल्ह्यात स्थित असून या हिल स्टेशनला तुम्ही पावसाळ्यात नक्की भेट द्यावी.

पाल (Pal) :

पाल हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आहे आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे जाताना तुम्हाला डोंगर, दऱ्या आणि हिरवळ पाहायला मिळते. येथे वनस्पती संग्रहालय, वन्यजीव अनाथालय आणि वन उत्पादनांचे संग्रहालय आहे. पालजवळ गर्भाडी धरण (Garbhadi Dam) आहे, जे सुकी नदीवर आहे. या हिल स्टेशनला तुम्ही सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी जाऊन आनंद घेऊ शकतात. जळगावपासून पालचे अंतर हे 65 ते 70 किमी इतके आहे.

तोरणमाळ (Toranmal):

तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. येथे सीताखाई, कमळजा माता मंदिर, गणेश तलाव आणि अप्रतिम दृश्ये पाहण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. हे हिल स्टेशन जळगाव शहरापासून सुमारे 207 किलोमीटर अंतरावर आहे. तोरणमाळला भेट देण्यासाठी 1 ते 2 दिवसांचा ट्रेप चांगला असतो.

चिखलदरा (Chikhaldara)

चिखलदरा जळगावपासून 284 किमी अंतरावर आहेत, जिथे लोक दूरवरून भेट देण्यासाठी येतात. पावसाळ्यात चिखलदरा फिरण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे. चिखलदऱ्याचे हे हिल स्टेशन हिरवीगार वनराई, धबधबे आणि थंड हवामान यामुळे सौंदर्य आणखीनच वाढते. येथे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत, जसे की भीमकुंड, पंचबोल पॉइंट, गावीलगड किल्ला, हरिकेन पॉइंट आणि बोटॅनिकल गार्डन. पावसाळ्यात चिखलदऱ्याला भेट देणे एक अविस्मरणीय अनुभव असतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now