महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 10वी ते ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरीची संधी! 167 जागांसाठी भरती

जुलै 23, 2025 2:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही महाराष्ट्रात चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी मोठी पदभरती सुरु आहे. विशेष या भरतीसाठी दहावी पास ते पदवी पास तरुण अर्ज करू शकतात. MSC Bank Recruitment Recruitment 2025

MSC Bank

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2025 ही निश्चित करण्यात आली आहे. त्यापूर्वी पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. MSC Bank Bharti 2025

पदाचे नाव आणि रिक्त पदसंख्या:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेनी ज्युनियर ऑफिसर44
2ट्रेनी असोसिएट्स50
3ट्रेनी टायपिस्ट09
4ट्रेनी ड्रायव्हर06
5ट्रेनी शिपाई (प्यून)58

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श. प्र.मि.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जून 2025 रोजी,18 ते 30 वर्षे आहे. तर
किती शुल्क भरावे लागेल?
पद क्र.1 पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1770/- रुपये फी भरावी लागेल.
तर पद क्र.2 ते 5 या पदांसाठी 1180/- रुपये फी भरावी लागेल.

किती पगार मिळेल ?

ट्रेनी ज्युनियर ऑफिसर – प्रशिक्षण कालावधीत 30,000/-, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 52,100/-
ट्रेनी असोसिएट्स – प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 25000/- स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणानंतर 34,400/-
ट्रेनी टायपिस्ट – प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 25000/- स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणानंतर 34,400/-
ट्रेनी ड्रायव्हर – प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 25000/- स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणानंतर 34,400/-
ट्रेनी शिपाई (प्यून) – प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 20000/- स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणानंतर 24,500/-

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now