जळगाव लाईव्ह न्यूज । रेशन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्डवर तुम्हाला कमीत कमी दरात अन्नधान्य दिले जाते. जर तुम्हीही रेशन कार्डधारक असाल आणि तुम्ही अद्याप तुमच्या रेशन कार्डचे eKYC केले नसेल, तर ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करा. जर असे केले नाही तर, तुम्हाला मिळणारे मोफत रेशन थांबू शकते. याचसोबत तुमचे रेशन कार्ड निष्क्रियदेखील केले जाऊ शकते.

सरकारने रेशन कार्ड केवायसी करणे अनिवार्य केले आहे. केवायसी करण्यासाठीची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. त्यामुळे तुम्ही जर अजूनही रेशन कार्ड केवायसी केले नसेल तर तुमच्याकडे अजून १० दिवस आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर केवायसी करा.

केवायसी कुठे अन् कसं करावं?
तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड केवायसी करु शकतात. ऑनलाइन केवायसी करायचे असेल तर Mera e-KYC या अॅपवर जाऊ करावे लागेल. याचसोबत तुम्ही जवळच्या रेशन दुकानावर जाऊनदेखील केवायसी करु शकतात.
जर तुम्हाला आधारकार्ड आणि रेशन कार्ड लिंक करायचे असेल तर rcms.mahafood.gov.in या वेबसाइटवर जाऊन करा. याचसोबत तुम्हाला शिधावाटप कार्यालयात जाऊनदेखील आधार आणि रेशन कार्ड लिंक करु शकतात.
रेशन कार्ड ईकेवायसीसाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड आणि बायोमॅट्रिक करणे आवश्यक आहे.याचसोबत दर तुमचे आधार आणि रेशन कार्ड लिंक असेल तर तु्म्ही ऑनलाइन सोप्या पद्धतीने केवायसी करु शकतात.












