Gold Rate : ग्राहकांच्या खिशाला झळ, जळगावात एकाच दिवसात सोने दरात मोठी वाढ, नवीनतम दर पहा..

जुलै 11, 2025 10:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२५ । मागच्या काही दिवसापासून सोने दरात कधी घसरण तर कधी वाढ होताना दिसत आहे. बुधवारी सोने दरात घसरण झालीय असताना दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी जळगावच्या सराफ बाजारात सोने दारात एकाच दिवसात १००० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आता सणासुदीचे दिवस जवळ येताना ग्राहकांच्या खिशाला झळ बसेल हे नक्की.

gold silver

ट्रम्प यांनी 1 ऑगस्टपासून कॅनेडियन वस्तूंवर 35% कर लावण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत, व्यापार अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमती पुन्हा वाढताना दिसत आहे.

जळगाव सराफ बाजारात सोन्याचा दर पुन्हा जीएसटीसह लाखाच्या वर गेला आहे. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ८९,१९५ रुपये प्रति तोळ्यावर आहे तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ९७३०० (जीएसटीसह १००२१९) रुपयावर पोहोचला आहे. तर चांदीचा दर स्थिर दिसून आला. सध्या चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी १०८००० रुपयावर आहे.

दरम्यान सणासुदीचे दिवस तोंडावर असताना सोन्याच्या दरवाढीने खरेदीदारांची झोप उडवली आहे तर चांदीची खरेदीही सर्वसामान्यांसाठी आवाक्याबाहेर गेली आहे. 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now