Gold Rate : जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दर पुन्हा वाढला ; आताचे दर काय?

जुलै 9, 2025 11:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२५ । एक दिवसाच्या घसरणीनंतर जळगावच्या सुवर्णपेठेत सोने दरात पुन्हा वाढ झाली. मंगळवारी सोने दरात प्रति तोळा ४०० रुपयांची वाढ झाली. अलीकडेच सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये तीव्र चढउतार दिसून येत आहेत. सध्या सोन्याचा दर जीएसटीसह एक लाखाच्या वर गेला आहे.

GS9July

जळगावच्या सराफ बाजारात या आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोने दरात ४०० रुपयांनी घसरले होते. मात्र मंगळवारी लगेच ४०० रुपयांनी वधारले. त्यामुळे आता सोने प्रतितोळे ९७,५०० (जीएसटीसह १,००,४२५) रुपये झाले. तर ३ जुलैपासून चांदी १,११,२४० रुपये किलोवर स्थिरावली आहे.

आंतरराष्ट्रीय सोने बाजारावर ट्रम्प सरकारने नव्याने टेरिफ जाहीर केल्याने सोन्याचे दर काही प्रमाणात अस्थिर आहेत. त्याचा हा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे लग्नसराई संपल्याने सराफ बाजारातील गर्दी कमी झाली असून, मागणी घटली आहे. १ ऑगस्टपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी १४ देशांसाठी टेरिफ जाहीर केल्यामुळे सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला आहे. ट्रम्पच्या टेरिफ धोरणांमुळे महागाईची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे आंतरराष्ट्रीय सोने बाजाराचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now