जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्ही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने MTS (मल्टी टास्किंग स्टाफ) आणि हवालदार यांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. SSC MTS Bharti 2025

इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०२५ पर्यंत आहे. त्यापूर्वी पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. या भरतीद्वारे एकूण १०७५+ जागा भरल्या जाणार आहे. SSC MTS Recruitment 2025

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:
1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)-
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
2) हवालदार (CBIC & CBN)- 1075
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८-२५ वर्षे (म्हणजे उमेदवाराचा जन्म ०२.०८.२००० पूर्वी आणि ०१.०८.२००७ नंतर झालेला नसावा). निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १८ ते २२ हजार रुपये पगार मिळेल
अर्ज शुल्क
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. आरक्षणासाठी पात्र असलेल्या महिला, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंगत्व (PwBD) आणि माजी सैनिक (ESM) या वर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज कसा भरायचा?
एसएससीने त्यांच्या नवीन वेबसाइट SSC.GOV.IN वर एक वेळ नोंदणी सुरू केली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप नवीन वेबसाइटवर OTR साठी नोंदणी केलेली नाही ते नोंदणी पूर्ण केल्यानंतरच कोणत्याही भरतीसाठी अर्ज करू शकतील. यासह, उमेदवार खाली दिलेल्या चरणांद्वारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात:
सर्वप्रथम आयोगाच्या अधिकृत वेबसाइट SSC.GOV.IN वर जा.
होम पेजवर, मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ आणि हवालदार भरतीवर क्लिक करा.
नोंदणी करा आणि आवश्यक तपशील तपासा.
फोटो, स्वाक्षरी, आयडी, अंगठा, पुरावा इत्यादी कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
जर उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागत असेल तर त्याला ते सबमिट करावे लागेल.
एसएससी मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (एमटीएस) हवालदार ऑनलाइन फॉर्म २०२५ सबमिट करा.
भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेण्यास विसरू नका.












