जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२५ । व्यावसायिक सिलिंडरचा काळाबाजार करण्यासाठी जमा केलेल्या १९ सिलिंडरचा साठा रामानंदनगर पोलिसांनी पिंप्राळ्यातील वीर सावरकर नगरातील एका वखारीजवळील एका घरात छापा टाकून जप्त केला. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अत्यावश्यक कायद्यान्वये एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळ्यातील वखारीजवळील रहिवासी वसिम चंगा शाह (वय २८) याच्यावर गॅस रिफिलिंगचा गुन्हा यापूर्वीच दाखल आहे. पोलिस नाईक विनोद सूर्यवंशी यांना वसिम याच्या घरात काळाबाजार करण्यासाठी गॅस सिलिंडरचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन हा मुद्देमाल केला जप्त पोलिसानी भारत गॅस कंपनीचे विना नोंदणी असलेले एक रिकामे सिलिंडर, गोगॅस कंपनीचे ८ भरलेले कमर्शियल सिलिंडर, गो गॅस कंपनीचे १० रिकामे सिलिंडर, दोन वजन काटे व १ रेग्युलेटर असा मुद्देमाल पोलिसांनी छाप्यात जप्त केला आहे.

पोलिस उप निरिक्षक सचिन रणशेवरे यांच्या पथकाने छापा टाकला. त्यात १९ सिलिंडर, २ वजनकाटे असा ५९४०० हजारा मुद्देमाल जप्त केला आहे. वसिम हा ज्या हॉटेल व्यावसायिकांकडे अधिकृत कमर्शियल सिलिंडर नाही अशांना काळाबाजारात सिलिंडरचा पुरवठा करत असल्याचे उपनिरिक्षक रणशेवरे यांनी सांगितले.









