यूनियन बँकेत 7वी/10वी पास उमेदवारांना नोकरी मिळविण्याची संधी ; इतका पगार मिळेल?

जून 28, 2025 2:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही सरकारी बँकेत नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. यूनियन बँकेत भरती सुरु असून यासाठी या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. Union Bank Recruitment 2025

Union Bank of India

यूनियन बँकेत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. ऑफिस असिस्टंट, अटेंडरसह इतर अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती unionbankofindia.co.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. यूनियन बँकेतील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा २२ ते ४० वर्षे असावी. या वयोगटातील उमेदवारांनीच अर्ज करावेत. Union Bank Bharti 2025

पात्रता :
फॅकल्टी पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट असावे. याचसोबत कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. अटेंडर पदासाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. माळी पदासाठी ७वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

किती पगार मिळेल?
फॅकल्टी असिस्टंट पदासाठी ३०,००० रुपये पगार मिळणार आहे. ऑफिसर असिस्टंट पदासाठी २०,००० रुपये पगार मिळणार आहे. अटेंडर पदासाठी १४००० रुपये पगार मिळणार आहे. माळी पदासाठी १२,००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

युनियन बँक ही सरकारी बँक आहे. त्यामुळे या बँकेत नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला खूप चांगला पगार मिळणार आहे. तसेच हा अनुभव तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. भविष्यात तुम्ही कधी दुसरीकडे नोकरीसाठी गेलात तर तुम्हाला खूप फायदा होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now