आशिया चषकाबाबत BCCI चा मोठा निर्णय ; पाकिस्तानसोबत खेळणार की नाही?

मे 19, 2025 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२५ । पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उध्वस्त केलं यांनतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने आगामी पुरुष आशिया चषकाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ या स्‍पर्धेत खेळणार नाही, असे बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदे(ACC)कडे स्‍पष्‍ट केले आहे. जून २०२५ मध्ये श्रीलंकेत होणाऱ्या महिला इ आशिया कप आणि 2025 मध्ये होणाऱ्या आशिया कपसाठी भारतीय संघाने नोंदणी मागे घेतली आहे.

asia cup

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आशिया चषक स्‍पर्धा न खेळण्‍याचा निर्णय घेतला आहे. सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी आहेत. रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्‍या सूत्रांनी म्‍हटलं आहे की, आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्‍यक्ष हे पाकिस्‍तानी आहेत. या स्‍पर्धेतचे आयोजन ACC करत आहेत. अशावेळी देशाच्‍या भावनांना सर्वोच्‍च प्राधान्‍य दिले जाणार आहे. आम्ही महिला इमर्जिंग टीम्स आशिया कपमधून माघार घेतल्याची माहिती ACC ला तोंडी दिली आहे. भविष्यातील त्यांच्या कोणत्याही स्पर्धेत भारताचा सहभाग नसेल. याबाबत आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत.”

स्‍पर्धा रद्द होण्‍याची शक्‍यता
आशिया कप २०२५ भारतात होणार होता. पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषक स्‍पर्धा होणार आहे. त्‍यामुळे आशिया चषक स्‍पर्धा ही टी20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार होती. २०२३ आशिया कप भारताने श्रीलंकेचा पराभव करून जिंकला होता. या स्पर्धेचे बहुतांश प्रायोजक भारतातील असल्यामुळे BCCI चा हा निर्णय स्पर्धा रद्द होण्‍याची शक्‍यता आहे. भारतासोबतच श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment