भारताच्या एअर स्ट्राईकमुळे १,२ नव्हे, तब्बल ‘इतके’ दहशतवादी ठार

मे 7, 2025 9:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२५ । 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यांनतर भारतात संतापाची लाट होती. पाकड्यांना जशास तसं उत्तर द्यावं, अशी मागणी भारतीयांची होती. अखेर भारताने दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पीओके आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे.

india strick pakistan 1

दरम्यान या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ९० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुरडिकेमध्ये ३० दहशतवादी मारले गेले. इतर छावण्यांमध्येही डझनभर दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भारताचे ऑपरेशन सिंदूर सक्सेस झाल्याचे म्हटले जात आहे.

कुठले दहशतवादी तळ उडवले?
भारतीय सैन्याने केलेल्या एअर Strike मध्ये बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, लष्कर कॅम्प सवाई, बिलाल कॅम्प, कोटली, बरनाल कॅम्प, सरजाल कॅम्प, मेहमूना कॅम्प POK आणि पाकिस्तानातील हे नऊ दहशतवादी तळ उडवण्यात आले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment