पुण्यातील सीमाशुल्क आयुक्तालयात 10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी ; 56,900 पगार मिळेल

एप्रिल 30, 2025 12:55 PM

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे, पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे,

Pune Customs

या पदांसाठी होणार भरती?
1) सीमॅन 04
2) ग्रीजर 07
3) ट्रेड्समॅन 03

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव आणि दोन वर्षांचे हेल्म्समन आणि सीमनशिप काम.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्री देखभालीवर समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mechanic/ Diesel/ Mechanic/ Fitter/Turner/ Welder/ Electrician/ Instrumental/Carpentry) (iii) अभियांत्रिकी/ऑटोमोबाइल/जहाज दुरुस्ती संघटनेत दोन वर्षांचा अनुभव.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 10 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षेअसावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार : 18000/- ते 56,900/- रुपये
नोकरी ठिकाण: पुणे

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Additional Commissioner of Customs, Office of the Commissioner of Customs, 4th Floor, GST Bhavan, 41/A, Sassoon Road, Pune – 411001.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 10 जून 2025

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment