सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत फक्त ५५० रुपयांत गॅस सिलिंडर मिळणार ; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

एप्रिल 10, 2025 4:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२५ । गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. सामान्य कुटुंबातील नागरिकांना एवढा महागसा गॅस सिलिंडर घेणे परवडत नाही. मात्र काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने एक अतिशय अद्भुत योजना सुरू केली होती. या योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे. या योजनेत सरकार गरीब कुटुंबातील नागरिकांना ५५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देते. या योजनेत सरकार १४.२ किलोच्या तीन सिलिंडरसाठी सब्सिडी देते. सरकार एकूण १६०० रुपये थेट महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करते.

gas subsidy

खरंतर ग्रामीण भागात अजूनही मोठ्या संख्येने महिला स्वयंपाकासाठी चुलीचा वापर करतात. या वापरून स्वयंपाक केल्याने खूप धूर निघतो. यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडर कमी किंमतीत दिले जात आहे.

उज्जवला योजनेचा दुसरा व्हर्जनदेखील लाँच करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना गॅस सिलिंडरवर सब्सिडी मिळते.केंद्र सरकारने २०१६ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेत गरीब कुटुंबातील नागरिकांना आणि ग्रामीण भागातील कुटुंबियांना एलपीजी गॅस दिले जातात.

पीएम उज्जवला योजनेसाठी पात्रता
महिला ही भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
महिलांचे वय १८ किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
अनुसूचित जाती किंवा जमातीतील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्यांनी पीएम आवास योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पीएम उज्जवला योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो, रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, केवायसी, बँक अकाउंट नंबर,बीपीएल प्रमाणपत्र आवश्यक आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला https://pmuy.gov.in/hi/ujjwala2.html या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर अप्लाय फॉर उज्वला कनेक्शनवर क्लिक करायचे आगे.
यानंतर तुम्ही गॅस एजन्सीचे नाव निवडायचे आहे. यानंतर Indane, Bharat Gas किंवा HP Gas पैकी ऑप्शन निवडायचा आहे.यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे.
यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट घेऊन गॅस एजन्सीमध्ये जायचे आहे. येथे तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment