---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा ; २१०० रुपये मिळणार की नाही?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२५ । राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज (10 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सगळ्यांचं लक्ष लागलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी घोषणा केली.

New Project 3 3

मुख्यमंत्री माझी लेक लाडकी योजनेसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. मात्र, लाडक्या बहिणींना २१०० मिळणार की नाही याबाबत अजित पवारांनी माहिती दिलेली नाही.

---Advertisement---

लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 23 हजार 232 कोटी खर्च झाला असून 2 कोटी 53 लाख महिलांना लाभ मिळाला. तर 2025-26 मध्ये 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी 2100 रुपये देऊ असं म्हटलं होतं. तुम्ही जे 2100 मान्य केलेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पातून देणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र लाडकी बहीण योजनेसाठी गेल्यावर्षी जी तरतूद करण्यात आली, तेवढ्याच रकमेची तरतूद 2025-26 वर्षासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहीणींना 2100 रुपये मिळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान लाडकी बहीण योजनेतून योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment