---Advertisement---
महाराष्ट्र बातम्या

फेब्रुवारीचा हप्ता मिळाला, आता मार्चचे १५०० कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगून टाकली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२५ । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या हप्त्यांचे एकत्र वाटप करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. पण महिल्यांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रूपये जमा झाले, त्यामुळे बहिणींनाही दिलासा मिळाला आहे. मात्र यानंतर आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? याबाबत चर्चेला उधाण सुरू झाले.

ladki bahin

मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत आता महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली, खात्यात पैसे कधी जमा होतील, याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली.

---Advertisement---

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक ७ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया दिनांक १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये व मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यात एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे !

लाडकीला २१०० रूपये कधीपासून मिळणार ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला २,१०० रुपये देण्याचे आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिले होते. या आश्वासनांची आम्ही पूर्तता करणार आहोत, यात कोणतीही शंका नाही. २१०० रुपयांबाबत नियोजन सुरू आहे, आमच्या घोषणेचे नक्कीच पालन करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment