---Advertisement---
बातम्या

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात महिला दिन उत्साहात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२५ । गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

GH women day

उपप्राचार्य जसनीत दया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांच्यासोबत विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थिनींनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी महिलांच्या सशक्तीकरणावर आधारित नृत्य, गीत आणि नाट्य सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. या वेळी महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि समाजातील भूमिकेवर तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

---Advertisement---

उपप्राचार्य जसनीत दया यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, नर्सिंग व्यवसायात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संवेदनशीलता, सेवा आणि समर्पण या गुणांमुळे महिला उत्कृष्ट परिचारिका बनतात. महिलांनी आपली क्षमता ओळखून स्वतःला सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.या कार्यक्रमात महिला कर्मचार्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि समानतेसाठी कार्य करण्याची शपथ घेतली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला सक्षमीकरण समिती, विद्यार्थी परिषद आणि शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याने सर्वांना प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळवून दिला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment