जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२५ । जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्यासाठी आणि बालकांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. कॉस्मोडर्म आयुर्वेद हॉस्पिटलच्या वतीने मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये स्त्रियांसाठी स्तनाचा कर्करोग निदान व बालकांसाठी (वय १ ते १८ वर्षे) सुवर्णप्राशन मोफत केले जाणार आहे.

हे मोफत शिबिर रविवार, दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडणार आहे. या शिबिरामध्ये स्त्रियांच्या स्तनांमधील गाठींची तपासणी अत्याधुनिक मशिनद्वारे करण्यात येणार आहे. तसेच, बालकांना रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे सुवर्णप्राशन विनामूल्य दिले जाणार आहे.
या शिबिरात प्रथम १०० महिलांसाठी विशेष आकर्षक भेटीचे आयोजनही करण्यात आले आहे. शिबिराचे स्थान डॉ. सारंग वि. जोशी आणि डॉ. रेणुका राजे-जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्मोडर्म आयुर्वेद हॉस्पिटल, स्वातंत्र्य चौक, रुपाली हॉटेलच्या मागे, आशिष प्ले स्कूलशेजारी, जळगाव येथे राहणार आहे.
अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी ८९५६३६३७७०, ७५०७७२८९५९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक हेट्रो हेल्थकेअर लिमिटेड यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या शिबिराचा महिलांनी आणि बालकांच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.