जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२५ । या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदी दरात वाढ दिसून आली. पण सोनं खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसापासून सोने दरातील वाढीला ब्रेक लागला असल्याचं दिसून आले. काल म्हणजेच गुरुवारी देखील सोन्याचे भाव घटले होते तर आजच्या दिवशी देखील सोनं कमी झालं आहे.

सध्या लग्न सराईचे दिवस आहेत, अशात बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची मागणी असते. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक उसळी घेतलीय. दरम्यान आज Good returns वेबसाईटनुसार, सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,005 रुपयांना विकलं जात आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,050 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,310 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,848 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,731 रुपयांनी विकलं जात आहे.