जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२५ । गेल्या काही दिवसांच्या दरवाढीच्या तुफान सत्रानंतर सोन्याने (Gold Rate)ब्रेक घेतला. जळगावच्या सुवर्णपेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण दिसून आली. मात्र चांदी (Silver Rate) दरात चढ उतार सुरूच आहे. गुरुवारी झालेल्या घसरणीनंतर शुक्रवारी चांदीचा दर वाढला आहे. Jalgao Gold Silver Rate Today

एकीकडे लग्नसराईची धामधूम सुरु असताना त्यातच जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याने चांदीच्या दराने ऐतिहासिक विक्रमी उच्चांकी गाठली आहे. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने जीएसटीसह ८९ हजारांचा तर चांदीच्या दराने १ लाखांचा आकडा ओलांडला आहे.
आज काय आहेत भाव?
काल जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०० रुपये प्रति तोळ्याने घसरले. यामुळे आज शनिवारी सकाळच्या सत्रात सोन्याचा २४ कॅरेटचा भाव ८६,५०० रुपये (जीएसटी ८९,१०० रुपये)प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. दुसरीकडे काल चांदी दरात १००० हजार रुपयाची वाढ झाली. यामुळे आता चांदीचा दर विनाजीएसटी ९९००० रुपये इतका आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय तसेच जागतिक आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी या सर्व गोष्टींचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होत असल्याचे सराव व्यवसायिकांचं म्हणणं आहे. गेल्या ५० दिवसात सोन्याच्या दरात तब्बल १५ हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.