मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 7वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी; 52,400 पर्यंत पगार मिळेल..

फेब्रुवारी 20, 2025 5:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुमचंही कमी शिक्षण झाले असेल आणि तुम्हीही सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठात भरती निघाली असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ”शिपाई” या पदासाठी ही भरती होणार आहे. विशेष 7वी पाससाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी आहे. Bombay High Court Nagpur Bharti 2025

court bharti

या भरतीद्वारे एकूण 45 रिक्त जागा भरल्या जातील. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ज्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2025 (05:00 PM) पर्यंत आहे. त्यापूर्वी पात्र उमेदवारांनी अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार हा कमीत कमी 07वी उत्तीर्ण असावा.
वयाची अट : 17 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : ₹50/-

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

किती पगार मिळेल?
या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 16,600/- ते 52,400/- पगार मिळेल. तसेच इतर भत्ते मिळतील
निवड प्रक्रिया :
चाळणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचीत पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षक्षमता, विशेष अर्हता चाचणीसाठी बोलविण्यात येईल व शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूतीत पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.
टिप २ः उमेदवारांची निवड ही उक्त नमुद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now