तरुणांनो तयारीला लागा; राज्यात लवकर होणार 10,000 जागांसाठी पोलिस भरती

जानेवारी 28, 2025 12:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२५ । महाराष्ट्रातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. ती म्हणजेच राज्यात १०,००० पदांसाठी ही भरती होणार आहे. फेब्रुवारीमध्ये ही भरतीप्रक्रिया सुरु होणार असून यामध्ये डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणारी पदेदेखील भरली जाणार आहेत. Maharashatra Police Bharti

Police Bharti

राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण पाहता, राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पोलिस भरती करण्याच्या विचारात आहे. गुन्हेगारीचा तपास करणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ही भरती आवश्यक आहे. प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व शहर पोलिस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिस आयुक्तालयाकडून रिक्त पदांचा आढावा मागितला आहे. 2024 पर्यंत रिक्त झालेल्या पदांची यादी मागवण्यात आली आहे.

मागील भरतीची परिस्थिती
मागील वेळी राज्यात 17 हजार पदांची भरती झाली होती, त्यासाठी राज्यभरातून तब्बल 18 लाख अर्ज आले होते. यावेळी देखील अशीच परिस्थिती राहील या पद्धतीने भरतीचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण व खास पथकाचे अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, “रिक्त पदांची माहिती मागवली आहे. त्यानुसार लवकरच भरती केली जाणार आहे. सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.”

भरती प्रक्रिया
या भरतीसाठी सराव चाचणी पावसाळ्याआधी करण्याचे नियोजन आहे. भरतीच्या प्रक्रियेत शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा यांचा समावेश असेल. शारीरिक चाचणीत पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वेगवेगळ्या चाचण्या असतील, ज्यामध्ये धावणे, गोळाफेक आणि इतर शारीरिक क्षमता चाचण्या समाविष्ट असतील. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र होतील.

पोलिस भरती कशी होणार?
सर्वप्रथम पात्र उमेदवारांना ग्राउंड परीक्षेसाठी बोलावले जाते. त्यात उत्तीर्ण झाल्यावरच लेखी परीक्षा घेतली जाते.
पोलिस भरतीसाठी तयारी करताना तरुणांना शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.
पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा ठरलेले असते. पुरुष उमेदवाराची उंची १६५ सेंटीमीटर असावी. तर महिला उमेदवाराची उंची १५५ सेंटीमीटर असावी. तर छाती ७९ सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now