---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र

गुडन्यूज : महावितरणकडून पहिल्यांदाच दर कपातीचा प्रस्ताव, कधीपासून लागू होणार नवीन दर?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२५ । काही वर्षांपासून राज्यातील नागरिकांना वाढत्या वीजदराचा (Electricity Rate) मोठा फटका बसत असून अव्वाच्या सव्वा वीज बिल (Electricity Bill) भरून जनतेचे कंबरडे मोडण्याची वेळ आलीय. मात्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण Mahavitarn) आपल्या इतिहासातील पहिल्यांदा वीज दर कपातीचा अभिनव प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. या प्रस्तावानुसार, 2025-26 ते 2029-30 या कालावधीत वीज दर 12% ते 23% कपात होणार आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील 2 कोटी 80 लाख वीज ग्राहकांना फायदा होणार आहे. हे नवे वीज दर 1 एप्रिल 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे.

Mahavitaran Bharti jpg webp webp

वीज दर :
महावितरणने या प्रस्तावात विविध पात्रांसाठी वीज दर कपातीची योजना समोर ठेवली आहे. 2025-26 या वर्षामध्ये जे घरगुती वीज ग्राहक 100 यूनिट पेक्षा कमी वीज वापरतात, त्यांना 15% कपातीचा प्रस्ताव आहे. या ग्राहकांना सध्या एका यूनिटला 5.14 रुपये द्यावे लागतात, तर 2029-30 मध्ये त्यांना एक यूनिट वीज 2.20 रुपयांना मिळेल.

---Advertisement---

जे ग्राहक 101-300 यूनिट वीज वापरतात, त्यांना सध्या एका यूनिटला 11.06 रुपये द्यावे लागतात. दरकपातीच्या प्रस्तावानंतर त्यांना 2030 मध्ये एक यूनिट वीज 9.30 रुपयांना उपलब्ध होईल. या पात्रातील घरगुती वीज ग्राहकांची संख्या मोठी आहे.

जे ग्राहक 301-500 यूनिट वीज प्रतिमहिना वापरतात, त्यांना एका यूनिटला 15.60 रुपये द्यावे लागतात. 2029-30 मध्ये त्याचा दर 15.29 रुपये प्रति यूनिट असेल. 500 यूनिट पेक्षा जे अधिक वीज वापरतात, त्यांच्यासाठीचा सध्याचा प्रति यूनिट दर 17.76 रुपये आहे तो पाच वर्षानंतर 17.24 रुपये असेल.

औद्योगिक ग्राहकांना दिलासा
महाराष्ट्रातून उद्योगांनी बाहेर जावू नये यासाठी औद्योगिक ग्राहकांना देखील दिलासा देण्यासंदर्भात प्रस्ताव आहे. साधारणपणे त्यांच्या वीज बिलात तीन महिन्यात 3% कपातीचा प्रस्ताव आहे, तर पाच वर्षात 11% कपात अपेक्षित आहे.

नवीकरणीय ऊर्जेचा फायदा
महावितरणने नवीकरणीयक्षम ऊर्जा प्रकल्पातून किफायतशीर दरात वीज उपलब्ध होणार असल्यानं आणि कृषीपंपासाठी लागणार्या वीजेचा वापर सौर कृषीपंपांसाठी केल्यानं कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी फीडर प्रकल्प 2.0 यामधील प्रकल्प येत्या दोन वर्षात सक्रिय होतील, ज्यामुळे 16000 मेगावॅट वीज निर्मितीचा प्रयत्न असल्याचं सांगितले गेले आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी वाढ
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वीजेच्या दरात मात्र वाढ प्रस्तावित आहे. सध्या त्यासाठी प्रतियूनिट दर 7.30 रुपये आकारला जातो. त्यात 35% वाढ अपेक्षित असून एका यूनिटचा दर 9.86 रुपये असू शकतो.

नवे दर लागू होण्याची तारीख
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले की 1 एप्रिल 2025 पासून वीज दर कपातीचा निर्णय लागू होऊ शकतो. लोकेश चंद्रा यांनी 2030 पर्यंत वीजनिर्मिती क्षमता 81000 मेगा वॅटपर्यंत नेण्याचा विचार असल्याचं म्हटलं. महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी म्हटले की वीज बिलामध्ये पुढील पाच वर्ष 12 ते 23% कपात होऊ शकते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---