लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार? अजित पवारांनी तारीखच सांगून टाकली
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२५ । राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत (Ladki Bahin Yojana) जुलै २०२४ पासून दरमहा १५०० रुपये दिले जात असून या योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिनाअखेरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता जानेवारीच्या हप्त्याची लाभार्थी महिला वाट बघत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाडकी बहीण योजनच्या जानेवारी हप्त्याबाबात मोठी अपडेट दिली आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार? याबाबात प्रश्न विचारले असता, अजित पवार यांनी मोठी माहिती दिली आहे. २६ तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे खात्यात जमा होतील, असं अजित पवार म्हणालेत.
तसेच उद्यापासून विविध विभागांना भेटून बैठका घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यंदाचा अर्थसंकल्प हा आर्थिक शिस्त लावणारा असणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आपली जबाबदारी वाढली आहे. महायुतीला लोकसभेला कमी जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता वेगळं चित्र आहे. विधानसभेला आपल्याला चांगलं यश मिळाले. कोणतेही यश अपयश कायम नसतं. आपल्याला यात सातत्य ठिकवायचंय, असेही अजित पवार म्हणाले.