---Advertisement---
नोकरी संधी

युको बँकेत ग्रॅज्युएशन उमेदवारांना सुवर्णसंधी; तब्बल २५० जागांसाठी भरती

---Advertisement---

तुम्हीही बँकेत नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. युको बँकेत (UCO Bank) सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. UCO Bank Bharti

युको बँकेत लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमार्फत तब्बल २५० जागा भरल्या जातील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ucobank.com या वेबसाइटवर सर्व माहिती देण्यात आली आहे. या भरती मोहिमेत तुम्ही ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकतात.

गुजरातमध्ये ५७ पदे भरती केली जाणार आहे. महाराष्ट्रात ७० पदे भरती केली जाणार आहे. आसासममध्ये ३० पदांसाठी रिक्त जागा आहे. कर्नाटकमध्ये ३५ जागा तर त्रिपुरामध्ये १३ जागांवर ही भरती केली जाणार आहे.जम्मू काश्मीरमध्ये ५ रिक्त पदे आहे.

पात्रता काय?
युको बँकेतील या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

युको बँकेतील या भरती मोहिमेत २० ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुमची रिजनिंग आणि कॉम्प्युटर अॅप्टीट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे. त्यानंतर तुमची निवड केली जाणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---