नोकरी संधी

रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तुम्हीही रेल्वेत नोकरी (Railway Bharti) करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. रेल्वेत सध्या ४००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष १०वी पास असलेल्या तरुणांना नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावा. Railway Recruitment

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे. तुम्ही www.scr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. रेल्वेतील ही भरतीप्रक्रिया विविध ट्रेड्समधील अप्रेंटिस पदासाठी होणार आहे.

पदाचे नाव आणि पात्रता :
यामध्ये एअर कंडिशनिंग, कारपेंटर, डीझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, पेंटर, वेल्डर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित विषयात आयटीआय केलेले असावे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष असावे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७,७०० ते २०,२०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे होणार आहे. १०वी आणि आयटीआयला मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी तुम्ही scr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button