मकरसंक्रांत झाली; आता लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता केव्हा मिळणार? मोठी अपडेट समोर
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२५ । राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण(Ladki Bahin Yojana) योजने अंतर्गत पात्र उमेदवारांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. जुलै २०२४ पासून ही योजना सुरु झाली असून या योजनेचे डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे खात्यात जमा झाले आहे. यांनतर लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीपर्यंत, म्हणजे १४ जानेवारीपर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार, असं सांगण्यात येत होते. मात्र अद्यापही जानेवारीचा हप्ता जमा झाला नसून आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. अशातच जानेवारीच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय. January installment of Ladaki Baheen Yojana
जानेवारी महिन्याचा हप्ता केव्हा येणार?
लाडकी बहीण योजनेतील महिलांना आतापर्यंत सहा हप्त्याचे ९००० रुपये मिळाले आहेत, पण जानेवारी महिन्याचा हप्ता येण्याआधी महिलांच्या अर्जाची तपासणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, फक्त तक्रारी आल्यानंतरच महिलांचे अर्ज तपासले जातील. जानेवारी महिन्याचे पहिले १५ दिवस उलटून गेले तरी, अजून पुढचा हप्ता आला नाही, यामुळे महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.
अपात्र महिलांना अर्ज माघारी घेण्याची सूचना
लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांना स्वतः हून अर्ज माघारी घेण्यास सांगितले जात आहे. जर तुम्ही अपात्र असाल तरीही तुम्हीही अर्ज माघारी घ्या, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो, असे सांगण्यात येत आहे.
२१०० रुपये कधी मिळणार?
महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेत महिलांना मार्च महिन्यापासून २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सूत्रे सांगत आहेत.