⁠ 
गुरूवार, जानेवारी 9, 2025
Home | बातम्या | मुक्ताईनगरमध्ये गुरांची निर्दयतेने वाहतूक; पोलिसांची मोठी कारवाई

मुक्ताईनगरमध्ये गुरांची निर्दयतेने वाहतूक; पोलिसांची मोठी कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर खडसे फार्म हाऊस जवळून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे चारचाकी वाहनातून गुरांची निर्दयतेने वाहतूक केली जात होती. या प्रकरणात मुक्ताईनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

ही घटना नुकतीच समोर आली असून, पोलिसांना गोपनिय माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी त्वरित धाव घेतली गेली. वाहन क्रमांक (एमएच ४८ एवाय ०३५६) असलेल्या चारचाकी वाहनात बैलांना कोंबून आणले होते, ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला गेला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे निष्पन्न झाले की वाहनात गुरांची अत्यंत निर्दयतेने वाहतूक होत होती.

पोलीसांनी संशयित आरोपी म्हणून मन्यार शेख मुस्तफा शेख अरमान (वय २५) रा. सिडफार्म, मुक्ताईनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संदीप वानखेडे हे करीत आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्याबद्दल प्रशंसा व्यक्त केली जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.