जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२४ । राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पुढील वर्षातील म्हणजेच 2025 मधील शासकीय सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना २४ सार्वजनिक सुट्ट्या असून याशिवाय एक अतिरिक्त सुट्टी गिफ्ट मिळणार आहे. 2025 मध्ये भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी देण्यात आल्यामुळे 2025 मधील शासकीय सुट्ट्यांची संख्या 25 वर पोहोचली आहे.
2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी
प्रजासत्ताक दिन – 26 जानेवारी 2025
छत्रपती शिवाजी महाराज जयंती -19 फेब्रुवारी 2025
महाशिवरात्री-26 फेब्रुवारी 2025
होळी (दुसरा दिवस)-14 मार्च 2025
गुढी पाडवा- 30 मार्च 2025
रमझान ईद-31 मार्च 2025
रामनवमी -6 एप्रिल 2025
महावीर जन्म कल्याणक-10 एप्रिल 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल 2025
गुड फ्रायडे -18 एप्रिल 2025
महाराष्ट्र दिन -1 मे 2025
बुद्ध पौर्णिमा -12 मे 2025
बकरी ईद-07 जून 2025
मोहरम -06 जुलै 2025
स्वातंत्र्य दिन -15 ऑगस्ट 2025
पारशी नववर्ष दिन -15 ऑगस्ट 2025
गणेश चतुर्थी – 27 ऑगस्ट 2025
ईद ए मिलाद- 5 सप्टेंबर 2025
महात्मा गांधी जयंती- 02 ऑक्टोबर 2025
दसरा -02 ऑक्टोबर 2025
दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) – 21 ऑक्टोबर 2025
दिवाळी (बलिप्रतिपदा)- 22 ऑक्टोबर 2025
भाऊबीज- 23 ऑक्टोबर 2025
गुरुनानक जयंती -5 नोव्हेंबर 2025
ख्रिसमस-25 डिसेंबर 2025