⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | बातम्या | महायुतीमध्ये कोण-कोण मंत्री होणार? वाचा संभाव्य 43 मंत्र्यांची संपूर्ण यादी

महायुतीमध्ये कोण-कोण मंत्री होणार? वाचा संभाव्य 43 मंत्र्यांची संपूर्ण यादी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या १३ दिवसानंतर महाराष्ट्रात महायुतीचे नवं सरकार स्थापन होत आहे. आज महायुतीचा शपथविधी सोहळा होणार असून यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ आहे. तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार कि नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. यानंतर येत्या ११ डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली असून मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळयात पडेल याची उत्सुकता महायुतीच्या आमदारांमध्ये आहे. अशातच ४३ मंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे.

मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आत मंत्रीपद वाटप आणि नेत्यांच्या नावांची अधिकृत घोषणा बाकी आहे. राज्यात एकूण 288 विधानसभा जागांवर निवडणूक पार पडली. इथे मुख्यमंत्र्यासह एकूण 43 मंत्र्यांची क्षमता आहे. म्हणजेच कॅबिनेट आणि राज्यमंत्री या दोन्हीची एकत्रित संख्या यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. आतापर्यंत तिन्ही पक्षांचे 29 मंत्री होते. यामध्ये भाजप-शिवसेनेचे 10-10 आणि एनसीपीचे 9 मंत्री होते.

कोण आहेत भाजपचे संभाव्य मंत्री?
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
राधाकृष्ण विखे पाटील
सुधीर मुनगंटीवार
चंद्रकांत पाटील
गिरीश महाजन
सुरेश खाडे
रवींद्र चव्हाण
अतुल सावे
मंगल प्रभात लोढा
राहुल नार्वेकर
जयकुमार रावल
चंद्रशेखर बावनकुळे
बबनराव लोणीकर
पंकजा मुंडे
देवयानी फरांदे
किसन कथोरे
नितेश राणे
आशिष शेलार
संभाजी निलंगेकर
राहुल कुल

‘हे’ आहेत शिवसेनेचे संभाव्य मंत्री
एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संजय राठोड
उदय सामंत
तानाजी सामंत
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभुराज देसाई
भरत गोगावले
अर्जुन खोतकर
संजय शिरसाट
योगेश कदम

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री
अजित पवार (उपमुख्यमंत्री)
धनंजय मुंडे
दिलीप वळसे पाटील
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
धर्मराव आत्राम
आदिती तटकरे
अनिल पाटील
राजकुमार बडोले
माणिकराव कोकाटे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.