⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | बातम्या | गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट सांभाळणार शिवसेनेचा मोर्चा; हातात असणाऱ्या कागदपत्रांबाबत चर्चा

गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट सांभाळणार शिवसेनेचा मोर्चा; हातात असणाऱ्या कागदपत्रांबाबत चर्चा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२४ । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन दहा उलटले तरी अद्यापही महायुतीचे सरकार स्थापन झालं नाही. यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे महायुतीच्या बैठकांचे सत्र थांबले आहे. परंतु भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेते कामाला लागले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप याची चर्चा करण्यासाठी महायुतीमधील नेत्यांमध्ये भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि आमदार संजय शिरसाट दाखल झाले आहे. त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्या हातात असणाऱ्या कागदपत्रांबाबत चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी निश्चित केलेली यादी तर बावनकुळे यांना गुलाबराव पाटील देत नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे.

येत्या 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. त्यापूर्वीच खाते वाटपाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. यातच गिरीश महाजन यांनी काल रात्री एकनाथ शिंदे भेट घेत तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये खातेवाटप संदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

यातच शिवसेना नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवास्थानी आल्यानंतर भाजपचे नेते देखील आले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन आणि प्रविण दरेकरही बावनकुळे यांच्या भेटीला पोहचले आहेत. राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ पोहोचलेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीत गुलाबराव पाटील आणि आमदार संजय शिरसाट शिवसेनेचा मोर्चा सांभाळत आहेत. दुसरीकडे भरत गोगावले एकनाथ शिंदे यांच्या भेटीला ठाणे येथील निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत बैठक झाली.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यावे; गुलाबराव पाटील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकांना येत नाही. त्यामुळे महायुतीत बेबनाव असल्याची चर्चा आहे? त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, महायुतीत बिनसल काहीच नाही. मुख्यमंत्री दोन दिवस आजारी आहेत. परंतु विरोधकांकडून संभ्रम निर्माण केला गेला आहे. एकनाथ शिंदे यांनी आधीच सांगितले आहे नरेंद्र मोदी जो निर्णय होतील तो मला मान्य आहे. आगामी काळात असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पाहता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी आमची इच्छा आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत हे खालच्या थराचे व्यक्तीमत्व आहे. त्यांनी आधी शिवसेना संपवली. मग राष्ट्रवादी संपवली आणि आता काँग्रेस संपवली. ते कोणाचेच होत नाही. ते नौटंकीबाज आहेत. फक्त एक्टिंग करतात. ते आमचा एकही आमदार पाडू शकले नाही. त्यांनी उद्धव ठाकरे यांना चुकीच्या माहिती दिल्या. जसा चिकंगुनीया असतो तसो हा माणूस आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.