⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | बातम्या | राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब? कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब? कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले तरीही राज्यात अजून सरकार स्थापन झाले नाही. महायुतीला तब्बल २३० जागांवर यश मिळाले आहे. महायुतीकडून अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झालेला नाही. यातच येत्या 5 डिसेंबरला नवीन मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

यामध्ये नवीन मुख्यमंत्री कोण असणार? मुख्यमंत्र्याची लॉटरी कुणाला लागणार?, याबाबत बोललं जातंय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही संभाव्य मंत्र्यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासमोर 12 संभाव्य मंत्र्यांच्या नावांची यादी देखील जाहीर केली असल्याची माहिती आहे.

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
धनंजय मुंडे
आदिती तटकरे
अनिल पाटील
हसन मुश्रीफ
धर्मराव बाबा आत्राम
अजित पवार
छगन भुजबळ

राष्ट्रवादी अजित पवार गटातील ही काही संभाव्य मंत्र्यांची यादी आहे. मात्र याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र या नावांवर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री पदाचा विचार केल्यास राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशीच रचना असणार आहे. तर या तिघांसोबत एकूण 32 आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे..

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.