जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२४ । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर आज २३ नोव्हेंबर रोजी निकाल येण्यास सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे.
सध्या महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळाली. सध्याच्या निकालानंतर महाराष्ट्रात महायुती २१७ जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महाविकासआघाडी ५० जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर २१ जागांवर अपक्ष आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे राज्यात भाजपा-महायुतीची लाट आल्याचे दिसून आले आहे. भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीमध्ये भाजपला १२९ जागा, शिवसेना शिंदे गट ५५ तर अजित पवार गटाचे ३५ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस २० जागा, शिवसेना ठाकरे गट १७ जागा तर शरद पवार गट १३ जागांवर आहे.
एकंदरीत राज्यातील जनतेला महायुतीला कौल दिल्याचं सध्याच्या आकडेवारीवरून दिसून आहे. यामुळ राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असून यामुळे महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे.