युनियन बँकेत ग्रॅज्युएट्स पाससाठी तब्बल 1500 जागांवर भरती; पगार 85,920

नोव्हेंबर 11, 2024 10:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत तुमचंही नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आलीय. युनियन बँक ऑफ इंडियाने तब्ब्ल 1500 जागांवर भरती प्रक्रिया सुरु असून पदवी पास असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.

Union Bank of India

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली असून पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा. 13 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. Recruitment 2024 :

ही भरती स्थानिक बँक अधिकारी (LBO) या पदांसाठी होणार आहे. रिक्त 1500 जागांपैकी 613 पदे सामान्य श्रेणीसाठी, 404 पदे OBC प्रवर्गासाठी, 224 पदे SC प्रवर्गासाठी, 109 पदे ST प्रवर्गासाठी, 150 पदे EWS प्रवर्गासाठी आणि 60 पदे PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहेत.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD:₹175/-]
पगार : 48,480-2000/7-62,480-2340/2-67,160-26,80/7-85,920/-

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now