मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपीने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

सप्टेंबर 23, 2024 8:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२४ । राज्याला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेत त्याने पोलिसांवर गोळी झाडली. या घटनेत एक पोलीस अधिकारी ही जखमी झाल्याची माहिती असून त्यानंतर त्याने स्वत:वर देखील गोळी झाडली. यात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय. या घटनेने खळबळ उडाली.

Akshay Shinde

तळोजा कारागृहातून आज बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलीस ठाण्याकडे जात होते. त्यावेळी पोलिसांची बंदूक हिसकावून घेत त्याने स्वत:वर देखील गोळी झाडली. अक्षय शिंदे याने तीन राऊंड फायर केलेत.अक्षयने तीन गोळ्या झाडल्याने ही आत्महत्या नसून पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर करण्यात आल्याच म्हटलं जात आहे. बदलापूर मधील एका शाळेत त्याने अल्पवयीन मुलीवर त्याने अत्याचार केला होता. परंतु या प्रकरणात त्याला अडकवलं जात असल्याचा आरोप त्याच्या आईने केला होता.

बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणारा आरोपी अक्षय शिंदे याचे वय केवळ 24 वर्षे आहे. त्याचे तीन वेळा लग्न झाले होते. मात्र त्याच्या तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या. तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती देखील समोर आली होती. अक्षयवर दोन मुलींवर लैंगिक छळ केल्याचा आरोप होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now