डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

ऑगस्ट 20, 2026 7:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे १२ ते १८ ऑगस्ट या कालावधीत अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होत.

anti

या सप्ताहांतर्गत कार्यशाळा, शॉर्ट फिल्म, जनजागृतीपर रॅली, पोस्टर प्रदर्शन, घोषवाक्य सादरीकरण, निबंध स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय महाविद्यालयातर्फे काढण्यात आलेल्या जनजागृतीपर रॅलीत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. विजय बाविस्कर, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ. माया आर्विकर, सुरेंद्र गावंडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now