महाराष्ट्र शासनाकडून 50 हजार योजनादूतांची मेगाभरती, किती पगार मिळेल अन् कसा अर्ज कराल?

सप्टेंबर 8, 2024 3:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र शासनाकडून ५० हजार जागांसाठी भरती, बेरोजगार तरुणांना संधी, कसा कराल अर्ज?
बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठी मेगा भरती काढण्यात आली आहे. खरंतर शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

yojnadoot

योजनादूत म्हणजे काय?
प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. महाराष्ट्र शासनासह हे काम केल्यावर याचे एक प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला मिळेल.

काम काय करावे लागेल?
या योजनेत काम करण्यासाठी संबंधित उमेदवाराला सरकारने नागरिकांसाठी ज्या काही योजना सुरू केल्या आहेत त्याची माहिती घरोघरी पोहचवायची आहे. गावातील सर्व व्यक्तींना योजनांचा कशा पद्धतीने लाभ घेता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचे आहे. घरोघरी जाऊन लोकांना योजनांची माहिती देण्यापासून त्यांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत मदत करायची आहे.

पात्रता काय असेल?
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रहिवासी दाखला
पदवी प्रमाणपत्र
संगणक प्रमाणपत्र (MSCIT)

अर्ज कसा करायचा?
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला mahayojanadoot.org या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. येथे तुम्ही सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
सदर योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्ही १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची दिनांक आहे. या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now