---Advertisement---
बातम्या राष्ट्रीय वाणिज्य

नागरिकांनो लक्ष द्या! 1 जुलैपासून बदलणार हे महत्वाचे नियम, थेट खिशावर होणार परिणाम?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२४ । प्रत्येक महिन्याला आर्थिक नियमांमध्ये अनेक बदल होत असतात. यानुसार आता जून महिना संपून जुलै महिना सुरू होण्यासाठी अवघे १ दिवस शिल्लक राहिल आहेत. जुलै महिन्याच्या पाहिल्याच तारखेपासून असे अनेक बदल होणार ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो.अशामध्ये जुलै महिन्यामध्ये आर्थिक नियमांमध्ये नेमके काय बदल होणार आहोत ते आपण जाणून घेणार आहोत….

new rule1 july jpg webp

पेट्रोल आणि डिझेलसह एलपीजीच्या किमतीत बदल
एलपीजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सुधारल्या जातात. मात्र यावेळी केवळ एलपीजीच नाही तर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पीएनजीच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट संबंध सर्वसामान्यांशी असेल. गेल्या महिन्यात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 69 रुपयांनी कपात करण्यात आली होती. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन सरकार आल्यानंतर यावेळी घरगुती सिलिंडरच्या किमतीही कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

---Advertisement---

आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक
आयकर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत ठेवली आहे. त्यामुळे तुमच्याकडे फक्त एक महिना वेळ आहे. ३१ जुलै २०२४ नंतर आणि ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी दाखल केलेल्या ITR वर ५ हजार रुपये दंड आकारला जाईल. ३१ डिसेंबर २०२४ नंतर हा दंड वाढून १० हजार रुपये रुपये होईल. ITR उशीरा भरल्यास दरमहा १ टक्का व्याज आकारला जातो.

पेटीएम वॉलेट –
One97 कम्युनिकेशन्सची पेटीएम पेमेंट्स बँक वॉलेट २० जुलै २०२४ पासून इनअ‍ॅक्टिव म्हणजेच बंद होण्याची शक्यता आहे. शून्य बॅलेन्स असलेल्या वॉलेट आणि एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणतेही व्यवहार न केलेले वॉलेट बंद होऊ शकतात.

क्रेडिट कार्ड –
१ जुलैपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. एसबीआय क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. १ जुलैपासून सरकारी पेमेंटशी संबंधित व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट बंद केले जातील.

ICICI बँक क्रेडिट कार्ड –
ICICI बँकेने क्रेडिट कार्डमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. क्रेडिट कार्ड जारीकर्त्याने १ जुलै २०२४ पासून कार्ड बदलण्याचे शुल्क १०० रुपयांवरून २०० रुपये केले आहे. शुल्कातील हा बदल Emerald Private Metal Credit ला लागू होणार नाही.

सिटी बँक क्रेडिट कार्ड –
Axis Bank जी भारतातील Citibank क्रेडिट कार्ड आणि ब्रँड नावाचा लायसन्स प्राप्त वापरकर्ता आहे. Axis Bankने घोषणा केली होती की, Citibank ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या ब्रँडमध्ये ट्रान्सफर करणार आहे. हे क्रेडिट कार्डसोबत सेव्हिंग बँक अकाऊंट्सला लागू होईल. अधिसूचनेनुसार, हे ट्रान्सफर १५ जुलै २०२४ पर्यंत पूर्ण केले जाईल.

पीएनबी रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड –
PNB ने RuPay प्लॅटिनम डेबिट कार्ड प्रकारांसह लाउंज प्रवेशासाठी नियम सुधारित केले आहेत. सुधारित नियम १ जुलै २०२४ पासून लागू होतील. PNB प्रति तिमाहीत १ देशांतर्गत एअरपोर्ट लाउंज एक्सेस/रेलवे लाउंज एक्सेस प्रदान करेल. ET अहवालानुसार, ते वार्षिक आधारावर २ आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लाउंजमध्ये प्रवेश प्रदान करेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---