जळगाव लाईव्ह न्यूज । गुंतवणुकीचा करण्याचा विचार आला की आपण आधी सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करतो. जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची योजना बेस्ट आहेत. पोस्ट ऑफिसमार्फत अनेक योजना राबविल्या जातात. पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक केल्यास धोका कमी असतो. सरकारच्या या योजनेत कमी गुंतवणूक आणि जास्त नफा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये आपल्याला मॅच्युरिटी कालावधीनंतर आपले पैसे मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशी योजना सांगणार आहोत. ज्यात गुंतवणूक केल्यानंतर तुमचे पैसे दुप्पट होणार आहेत.
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र या योजनेत तुमचे पैसे दुप्पट होणार आहे. नागरिकांना जास्त नफा मिळवून देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत तुमचे पैसे काही महिन्यातच दुप्पट होतात. या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
किसान विकास पत्र योजनात तुम्ही एक किंवा दोन खाते उघडू शकतात. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावानेदेखील तुम्ही खाते उघडू शकतात. तुम्ही या योजनेत कितीही खाती उघडू शकतात. यासाठी कोणतीही मर्यादा नाही.पोस्ट ऑफिसच्या योजनेअंतर्गत व्याज हे तिमाहीच्या आधारावर ठरवले जाते. पोस्ट ऑपिसच्या या योजनेत ७.५ टक्के व्याजदर दिले जाते. हे व्याज वार्षिक आधारावर असते.
या योजनेत जर कोणी ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीपर्यंत म्हणजे ११५ महिन्यांपर्यंत या योजनेत तुम्हाला १० लाख रुपये मिळतील. या योजनेवर कर लागू होतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय असायला हवा. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असवाते. तसेच या योजनेत पौढ व्यक्ती आपल्या लहान मुलाच्या वतीनेदेखील अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतो. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरावा लागेल.