जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२४ । मध्य रेल्वेतील भुसावळ विभागातून धावणारी बडनेरा – नाशिक मेमू गाडीला फक्त ८ डबे असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. अनेकांना या गाडीत उभे राहण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही. ही गैरसोय पाहता रेल्वे प्रशासनाने ९ मे पासून बडनेरा – नाशिक मेमूला ४ डबे वाढवले आहेत.
ही गाडी आता १२ डबे घेऊन धावत आहे. ही गाडी सकाळी ११.०५ वाजता बडनेरा येथून सुटते. पुढे भुसावळहून ३.३० वाजता सुटून नाशिकला सायंकाळी ७.४० वाजता पोहोचते. यानंतर नाशिकहून रात्री ९१५ वाजता परत बडनेऱ्याकडे निघते. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता बडनेरा येथे पोहोचते.