जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२४ । आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे देशांतर्गत बाजारात मे महिन्याच्या पंधरवड्यात सोन्यासह चांदीच्या किमतीने ऐतिहासिक उसळी घेतली होती. यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला होता. मात्र जून महिन्यात सराफा बाजारात दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मागील काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. तर जून महिन्याच्या सुरूवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. शनिवारी संपलेल्या आठवड्यात जळगावच्या सुवर्णबाजारात चांदीच्या दरात तब्बल चार हजारांची, तर सोन्याच्या दरात १८०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे सध्या सोने ’जीएसटीसह’ प्रती दहा ग्रॅम ७३ हजार ३३६ होते तर चांदी प्रती किलो ९१ हजार ६७० रुपये होती.
रविवार बाजारात बंद असलयाने दर जाहीर झाले नाहीय. यापूर्वी २२ मेस चांदीच्या भावात तीन हजारांची वाढ झाली होती. तेव्हा चांदी प्रतिकिलो लाखावर जाते की काय? याबाबत विविध अंदाज वर्तविले गेले. सोनेही जीएसटीसह ७५ हजार रुपयावर गेले होते. मात्र जून महिना सुरु होताच सोन्यासह चांदीचा दरात मोठी घसरण दिसून आली.
सोन्याचे काही दिवसांतील दर (विना जीएसटी)
तारीख–सोने (प्रति तोळा)– चांदी (प्रतिकिलो)
४ मे– ७१ हजार २००–८१ हजार
७ मे–७१ हजार ६५०–८३ हजार
१८ मे–७४ हजार–९१ हजार
२२ मे–७४ हजार–९३ हजार
१ जून– ७१ हजार ६००–९० हजार
५ जून– ७२ हजार २००–९० हजार
८ जून– ७३ हजार–९३ हजार
९ जून–७१ हजार २००–८९ हजार