जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२४ । देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा शपथ घेणार आहे. आज सायंकाळी मोदींचा शपथविधी होणार असून त्यांच्यासोबत रक्षा खडसे यांच्यासह काही खासदारांना मंत्रिपदासाठी दिल्लीतून फोन आले आहे. महाराष्ट्रात भाजपच्या वाट्याला चार आणि एक मंत्रिपद शिंदे गटाच्या वाट्याला आणि दुसरं मंत्रिपद रामदास आठवले यांच्या वाट्याला येणार आहे. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून अद्याप कोणालाही फोन आला नाही. कोणाचेही नाव समोर आलेले नाही.
दोन दिवसांपासून प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर सुनील तटकरे यांचंही नाव पुढे येत होतं. मात्र अद्यापतरी अजित पवारांच्या वाट्याल मंत्रिपद येण्याची शक्यता नाही.यावरूनच शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर आरोप केले आहे.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे
त्या म्हणाल्या की, ज्या दिवसापासून अजितदादा भाजपबरोबर गेले आहेत, त्या दिवसापासून त्यांचा अपमान करण्याचा प्रकार सुरु आहे.”आताही त्यांना डावलून भाजपने त्यांचा अपमान केला आहे. प्रफुल्लभाईंना डावल्याचा प्रकार सुरु आहे. यातून भाजपला वेगळा संदेश द्यायचा आहे. कदाचित भाजपला यांची उपयुक्तता संपल्याचं दिसून येत आहे.” अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली आहे.