⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | लोकसभेच्या निकालाचा जळगावच्या सुवर्णनगरीवरही परिणाम ; पहा काय आहे सोन्या-चांदीचे दर?

लोकसभेच्या निकालाचा जळगावच्या सुवर्णनगरीवरही परिणाम ; पहा काय आहे सोन्या-चांदीचे दर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२४ । देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय जगतातील घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर वरखाली होत असतात. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा जळगावच्या सुवर्ण नगरीवरही परिणाम दिसून आला आहे.

जळगावातील सुवर्ण बाजारपेठेत सोन्याच्या दारात 700 रुपये तर चांदीच्या घरात तब्बल दोन हजार रुपयांनी वाढ झाली. सोन्याचे दर जीएसटीसह 74 हजार 200 रुपयांवर पोहोचले. तर 90 हजार रुपयांच्या आत असलेली चांदी Gst सह 94 हजार 760 रुपयांवर पोहोचली. लोकसभेच्या निकालानंतर शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे सोन्या-चांदीचे दर वाढल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.

शेतीची कामे, त्यातच लग्नसराई नाही आणि सोन्या चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे जळगावच्या सराफ बाजारात शुकशुकाट आहे. हीच परिस्थिती ऑगस्ट महिन्यापर्यंत राहील असा सुवर्ण व्यावसायिक यांनी अंदाज वर्तविला आहे. मोठी उलाढाल होणार नसल्याने सराफा व्यावसायिकांची पण चिंता वाढली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.