जळगाव शहर

गणेशोत्सवात मांडण्यात आला ७५ वर्षांचा इतिहास!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । भूमि फाउंडेशन, साकळी व सुकृतीचा राजा गणेशोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व गणेशोत्सव निमित्ताने स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षातील विविध घडामोडिंचे “चित्र प्रदर्शन” आयोजित केले होते. चित्रप्रदर्शनचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांनी केले. चित्र हे साकळी येथील चित्रकार व पत्रकार चंद्रकांत नेवे व दामोदर नेवे यांनी रेखाटले होते. त्यांचा सत्कार आमदार राजुमामा भोळे यांनी केला.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची भूमिका खुप महत्वाची होती. 1893 नंतर माननीय लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातूनच नागरिकांना विशेष करून युवकांना संघटित केले. नंतर तेच संघटित नागरिकांना स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी केले. सुकृती पिनाकल परिवारातील सर्वच सदस्य, परिवार विशेष म्हणजे गणेशोत्सव समिती अध्यक्ष चंद्रशेखर अहिरराव, सोसायटीचे अध्यक्ष ऍड. हेमराज चौधरी, जिल्हा सरकारी वकील ऍड.केतन ढाके, जितेंद्र पवार, नोबेल फाऊंडेशनचे जयदीप राजपूत , डॉ. संदीप पाटील, डॉ.सुदर्शन पाटील, डॉ. विश्वकर्मा, सचिन कुरंभट्टी, डॉ. वासुदेव सोनवणे, योगेश खैरनार, डॉ. अजित नांदेडकर, विपुल पारीख, सचिन शिंदे, पंकज मुक्कावर यांनी चित्रप्रदर्शन पाहिले.

सर्वच लहान-थोर, विद्यार्थीवर्ग यांनी अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित या चित्रप्रदर्शन पाहण्याचा आनंद घेतला व आ.सुरेश भोळे यांनी भूमि फाउंडेशनच्या डॉ. सुनिल पाटील, सौ.सुनीता पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाधान पाटील, महेंद्र पाटील, हेमंत वागळे, मुकेश मराठे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button