जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२१ । विवाहित मोठ्या मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या वृद्धाचा रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना जळगाव येथून म्हसावद येथे जात असतानाच आज शनिवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान शिरसोली जवळ मारुतीच्या मंदिराजवळ घडलीय. सुरेश गावडे (वय ५६) असे मृताचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर येथील सुरेश गावडे यांचे वाघनगर परिसरात चहा नाश्त्याचे हॉटेल आहे. शनिवारी 22 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुरेश गावडे हे त्यांची विवाहित मोठी मुलगी वर्षा हिला भेटण्यासाठी त्यांच्या (एम.एच. १९ ए.टी. ४२९९) या क्रमांकाच्या दुचाकीने म्हसावद येथे जात होते. यादरम्यान शिरसोली जवळ मारुतीच्या मंदिराजवळ त्यांच्या छातील कळा यायला लागल्या. छातील दुखत असल्याने त्यांनी दुचाकी थांबविली व ते मंदिरावर थांबले. याचठिकाणी काही वेळातच मृत्यू झाला. मंदिराजवळ असलेल्या वेफर व्यावसायिकाने मयत हे सुरेश गावडे असल्याची ओळख पटवित, त्यांच्या शिरसोली येथील नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडी पोलिसांनीही घटनास्थळ गाठले व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. मयत सुरेश गावडे यांच्या पश्चात दोन मुले महेंद्र व दिपक तसेच सूना, सोनल व मनिषा तसेच तीन नातंवडे असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे देखील वाचा :
- भुसावळमार्गे धावणार मुंबई–दानापूर एकेरी विशेष ट्रेन
- जळगाव शहर पोलिसांची चोरीच्या गुन्ह्याचा छडा; तीन आरोपी अटकेत, १० हजारांची रोकड जप्त
- त्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे ; आसोदा पुलावरून मंत्री गुलाबराव पाटील कडाडले
- निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
- मुक्ताईनगरातील ट्रॅव्हल्समधील डिझेल चोरीचा उलगडा, भिवंडीतील दोन आरोपी जेरबंद










