⁠ 
रविवार, मे 19, 2024

काळानुसार ‘हिंदु राष्ट्रा’साठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवा ! – नंदकुमार जाधव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । ‘सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. समाज आणि राष्ट्र सुरळीत चालवायचे असेल, तर धर्माच्या अधिष्ठानाची सर्वच क्षेत्रांत आवश्यकता आहे. व्यक्तीगत किंवा सामाजिक जीवनात धर्माचे अधिष्ठान आले की, व्यक्ती नीतीमान बनतो आणि गैरप्रकार करण्यापासून परावृत्त होतो. त्यामुळे धर्माचे अधिष्ठान असेल, तरच धर्मनिष्ठ अर्थात् आदर्श अशा समाजाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे राष्ट्राला खर्‍या अर्थाने उर्जितावस्था मिळवायची असेल, तर प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन, धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवाच आहे, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी या वेळी केले. सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. ला.ना. हायस्कूलच्या भाऊसाहेब गंधे सभागृह याठिकाणी तसेच परिश्रम मंगल कार्यालय चोपडा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. चोपडा येथे कु. रागेश्री देशपांडे यांनी जिज्ञासूंना संबोधित केले. तसेच सनातन संस्थेच्या वतीने देशभरात 154 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

काळानुसार ‘हिंदु राष्ट्रा’साठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवा ! – सद्गुरू नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
जळगाव -‘सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. समाज आणि राष्ट्र सुरळीत चालवायचे असेल, तर धर्माच्या अधिष्ठानाची सर्वच क्षेत्रांत आवश्यकता आहे. व्यक्तीगत किंवा सामाजिक जीवनात धर्माचे अधिष्ठान आले की, व्यक्ती नीतीमान बनतो आणि गैरप्रकार करण्यापासून परावृत्त होतो. त्यामुळे धर्माचे अधिष्ठान असेल, तरच धर्मनिष्ठ अर्थात् आदर्श अशा समाजाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे राष्ट्राला खर्‍या अर्थाने उर्जितावस्था मिळवायची असेल, तर प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन, धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवाच आहे, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी या वेळी केले. सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. ला.ना. हायस्कूलच्या भाऊसाहेब गंधे सभागृह याठिकाणी तसेच परिश्रम मंगल कार्यालय चोपडा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. चोपडा येथे कु. रागेश्री देशपांडे यांनी जिज्ञासूंना संबोधित केले. तसेच सनातन संस्थेच्या वतीने देशभरात 154 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.