---Advertisement---
बातम्या वाणिज्य

JIO युजर्ससाठी नवीन आणि आकर्षक 5G प्लॅन लॉन्च; किंमत आणि फायदे जाणून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । रिलायन्स जिओने (Reliance JIO) त्याच्या युजर्ससाठी एक नवीन आणि आकर्षक प्लॅन लॉन्च केला आहे, ज्यामुळे तुम्हाला वर्षभर अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. विशेष म्हणजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा रिचार्ज प्लॅन तुमच्या मित्राला गिफ्ट करू शकता. या प्लॅनची किंमत 601 रुपये आहे आणि तो मायजिओ अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे.

jio jpg webp

कोणासाठी आहे हा प्लॅन?
हा अनलिमिटेड 5G व्हाउचर प्लॅन अशा जिओ युजर्ससाठी आहे जे आधीपासूनच सक्रिय प्रीपेड योजना वापरत आहेत. युजर्सला रोज कमीत कमी 1.5GB ते 4GB डेटा असलेला प्लॅन घ्यावा लागेल. मासिक किंवा तीन महिन्यांचा प्लॅन निवडणे आवश्यक आहे, परंतु रोज 1GB डेटा प्लॅन किंवा 1,899 रुपयांच्या वार्षिक प्लॅनवर असलेल्या युजर्ससाठी हा व्हाउचर वैध नाही.

---Advertisement---

कसे खरेदी करावे आणि काय मिळेल?
601 रुपयांच्या या व्हाउचर प्लॅनमध्ये 12 महिन्यांपर्यंत अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. हा व्हाउचर मायजिओ अ‍ॅपवरून खरेदी केला जाऊ शकतो आणि तुम्ही तो स्वत:साठी किंवा मित्रांसाठी किंवा कुटुंबासाठी देऊ शकता. व्हाउचर अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी, युजर्सकडे 199, 239, 299, 319, 329, 579, 666, 769 आणि 899 पर्यंतचा कोणताही रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे. एकदा व्हाउचर अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर, युजर्सला रोज 3GB किंवा 4GB डेटा आणि अनलिमिटेड 5G मिळेल.

इतर व्हाउचर प्लॅन्स
रिलायन्स जिओचा हा नवीन अनलिमिटेड 5G व्हाउचर प्लॅन त्याच्या युजर्ससाठी एक मोठी भेट आहे. हा प्लॅन न केवळ स्वत:साठी तर मित्रांना आणि कुटुंबियांना देखील गिफ्ट करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे वर्षभर डेटा संपण्याची चिंता संपून, हाय स्पीडवर स्ट्रीमिंग करण्याचे स्वातंत्र्य मिळेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---