1 डिसेंबरपासून ‘हे’ 5 नियम बदलणार; थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार

नोव्हेंबर 30, 2024 3:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२४ । उद्यापासून वर्षाच्या शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. डिसेंबरच्या 1 तारखेपासून अनेक नियमात बदल होणार आहेत. ज्यांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून देशात लागू होत असलेल्या या प्रमुख बदलांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती आणि एसबीआयच्या क्रेडिट कार्ड संबंधित बदलांचा समावेश आहे.

1st december 2022 jpg webp

एलपीजी सिलेंडरची किंमत
प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 1 नोव्हेंबरला 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. तेल आणि वायू वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किंमतीत सुधारणा करतात. दीर्घकाळापासून स्थिर असलेल्या 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

एटीएफ किमतींमध्ये बदल
एलपीजी सिलिंडरच्या किमतींसोबतच एअर टर्बाइन इंधन (ATF) ची किंमत देखील तेल वितरण कंपन्यांकडून महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारित केली जाते. यानंतर 1 डिसेंबरला हवाई इंधनाच्या किमतीतही बदल होऊ शकतो. या बदलांचा थेट परिणाम हवाई प्रवाशांवर दिसून येत आहे.

एसबीआय क्रेडिट कार्ड नियम
तुम्ही डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांसाठी एसबीआय क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर 1 डिसेंबरपासून नवीन नियम लागू होत आहेत. एसबीआय कार्ड्स वेबसाइटनुसार, 48 क्रेडिट कार्ड डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स देणार नाहीत.

ओटीपीची प्रतीक्षा करावी लागेल
ट्रायनचा व्यावसायिक संदेश आणि ओटीपीशी संबंधित ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्याचा निर्णय 1 डिसेंबरपासून लागू हाेणार आहे. यापूर्वी दूरसंचार कंपन्यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत त्याची अंमलबजावणी करायची होती. परंतु अनेक कंपन्यांच्या मागणीनंतर त्याची अंतिम मुदत 31 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. टेलिकॉम कंपन्या ट्रायचा हा नियम 1 डिसेंबरपासून लागू करू शकतात. हा नियम बदलण्याचा उद्देश हा आहे की दूरसंचार कंपन्यांनी पाठवलेले सर्व संदेश ट्रेस करण्यायोग्य असतील, जेणेकरून फिशिंग आणि स्पॅमची प्रकरणे थांबवता येतील. नवीन नियमांमुळे ग्राहकांना ओटीपी येण्यात विलंब होऊ शकतो.

बँक सुट्टी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबरसाठी बँक सुट्टीची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार डिसेंबरमध्ये एकूण 17 दिवस बँकांना सुट्या असतील. डिसेंबरमध्ये शिल्लक असलेल्या कामासाठी शाखेत जाण्यापूर्वी बँकेच्या सुट्टीची यादी तपासणे आवश्यक आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now