⁠ 
सोमवार, जानेवारी 13, 2025
Home | बातम्या | भुसावळातील खून प्रकरणात 5 संशयित पोलिसांच्या जाळ्यात ; 4 पिस्तूल अन् 3 काडतूस जप्त

भुसावळातील खून प्रकरणात 5 संशयित पोलिसांच्या जाळ्यात ; 4 पिस्तूल अन् 3 काडतूस जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२५ । भुसावळ शहरात दिनांक 10 रोजी सकाळी चहाच्या दुकानात घुसून तहरीन शेख नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. दरम्यान, यानंतर हल्लेखोर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणातील 6 पैकी 5 आरोपींना मनमाड येथून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 पिस्तूल अन् 3 काडतूस जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावर भुसावळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
या घटनेबाबत असे की, भुसावळ शहरातील जाममोहल्ला भागातील डीडी कोल्ड्रिंग्सच्या दुकानामध्ये तहरीन शेख चहा पिण्यासाठी आला होता. यावेळी तनवीरवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार करताना हल्लेखोर CCTV मध्ये कैद झाले होते. या हत्येच्या नंतर हल्लेखोर पसार झाले होते

या गोळीबारामध्ये संशयित आरोपी तनवीर माजीद पटेल, अनवर पटेल, रमीज पटेल, शेख साहील शेख रशीद यांनी मारहाण अन् शिवीगाळ करत गोळीबार केला. या कटामध्ये संशियित आरोपी मजीद पटेल अदनान उर्फ काल्या शेख युनुस यांनी यांच्यासह 4 यांचे सोबत संगनमत करून कट रचुन तेहरीम अहमद नासीर शेख याचा खुन केला आहे. म्हणुन संशयित आरोपी तनवीर मजीद पटेल, अनवर पटेल, रमीज मटेल, शेख साहील शेख रशिद, मजीद पटेल, अदनान उर्फ काल्या शेख युनुरा सर्व रा. भुसावळ याचे विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनलामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.