शेतकऱ्यांवर महागाईची झळ ; रासायनिक खताच्या किमती झाल्या दुप्पट
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । रासायनिक खताच्या किमतीमध्ये गेल्या ५ वर्षात तब्बल दुपटीने भाववाढ झाली आहे. येत्या काळात याचे भाव अजून वाढतील असा अंदाज आहे. मात्र यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. याच बरोबर शेतकरी बांधवांना , शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. यावर कोणताही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत. (The prices of chemical fertilizer duble )
कंपन्यांनी रासायनिक खताच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या पाच वर्षात भाववाढ केली आहे. जवळपास ४० टक्क्यांपर्यंत ही वाढ गेल्या एका वर्षात झाली. गत २ वर्षापासून कोरोनाशी संघर्ष करता करता शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. कंपन्यानी रासायनिक खतांच्या किमतीमध्ये एकाच वेळी जवळपास ४० टक्क्यांनी वाढ केल्याने शेतकरी वर्गासमोर नवीन मोठे संकट उभे ठाकले आहे.
गत २ वर्षापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गास अनंत अडचणींचा सामना करावा लागला आहे. शासनाने लॉकडाउन जाहीर केल्याने भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. मात्र, रासायनिक खताच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र आहे.
सरायनिक खतांचे वाढते भाव
मालाचा प्रकार | २०१४ भाव | २०२२ भाव |
पोटॅश | ९५० | १७०० |
१०-२६-२६ | ११५० | १४७० |
१२-३२-१६ | ११६० | १४८० |
डी ए पी | ११८७ | १३५० |
एस एस पी पावडर | ३३० | ५२० |
एस एस पी ग्रनुअल | ३९० | ५६० |